Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अध्यापनाचा 'आदर्श' वारसा जपणारे 33 वर्षांच्या ज्ञानदानाचा प्रवासानंतर दादासाहेब हंगरकर सेवानिवृत्त; मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात काटी आणि बरमगाव ग्रामस्थांकडून भावनांना वाट

काटी/उमाजी गायकवाड 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बरमगाव (ता. धाराशिव) येथे कार्यरत असलेले आणि काटी (ता. तुळजापूर) चे सुपुत्र सहशिक्षक श्री.दादासाहेब शंकर हंगरकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त शनिवार, दि. 28 रोजी सपत्नीक 
भव्य सत्कार करण्यात आला. दीर्घकाळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून निवृत्त झालेल्या हंगरकर सरांच्या सन्मानार्थ आयोजित या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

श्री. दादासाहेब हंगरकर यांनी आपल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले.त्यांनी सुरुवातीला तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी, सावरगाव आणि त्यानंतर धाराशिव तालुक्यातील मेंढा, बोरगाव (राजे) व शेवटची काही वर्षे बरमगाव येथे उत्कृष्टपणे सेवा बजावली.

या मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा:
बरमगाव शाळेत झालेल्या या सोहळ्याला धाराशिवचे गटशिक्षणाधिकारी असरार साहेब, विस्तार अधिकारी बापू शिंदे, जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन बाबा मते, बापू पडवळ आणि सरपंच मोहनराव जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे संचालक श्री.अनिल हंगरकर,अमरसिंह गोरे,गणेश कदम, बळवंतराव घोगरे, विकास चव्हाण, प्रवीण बनकर, भालचंद्र कोकाटे,राजेंद्र गव्हाणे, निंबाळकर सर, तसेच महेश हंगरकर, अजित हंगरकर, अखिल शितोळे, महेश दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी हंगरकर सरांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

"शाळेतील प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी नवीन शिकवण देणारा होता..
      --दादासाहेब हंगरकर 

"33 वर्षांचा हा प्रवास निव्वळ नोकरी नव्हता, तर माझ्यासाठी ते एक संस्कारांचे व्रत होते. पांगरदरवाडी ते बरमगाव या प्रवासात हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देता आली, याचे समाधान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे. शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो, तो केवळ शाळेच्या चौकटीतून बाहेर पडून समाजाचा मार्गदर्शक होतो. विद्यार्थ्यांचे प्रेम आणि पालकांचा विश्वास हीच माझी आजवरची खरी पुंजी आहे. तसेच शाळेतील प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी नवीन शिकवण देणारा होता. आज निवृत्त होताना डोळ्यांसमोर फक्त माझे विद्यार्थी आणि त्यांनी दिलेले प्रेम आहे. ही सेवा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे श्रेय माझे सहकारी आणि माझ्या कुटुंबाला जाते."
        --दादासाहेब हंगरकर 
      सेवानिवृत्त शिक्षक बरमगाव.ता.जि. धाराशिव

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments