Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सराटीतील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमल राठोड यांचा उद्या 'सेवापूर्ती गौरव सोहळा'

अणदूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
 तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती राठोड विमल देविदास या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या गौरवशाली सेवापूर्तीनिमित्त उद्या, मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य 'सेवापूर्ती गौरव सोहळा' आयोजित करण्यात आला आहे.

अणदूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत हा सोहळा पार पडणार असून, शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची रुपरेषा:
स्थळ: जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, अणदूर.

वेळ: मंगळवार, दि. २८/०४/२०२६ रोजी सकाळी १०:०० वा.

प्रमुख उपस्थिती:
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूर बीटच्या विस्तार अधिकारी मा. श्रीमती शोभा माणिकराव राऊत मॅडम राहणार आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. जितेंद्र कानडे आणि तुळजापूरचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. अर्जुन जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यासोबतच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मीनाताई चंद्रकांत कलकोटे, सराटीच्या सरपंच सौ. मल्लवाबाई व्हेंद्रे, केंद्रीय मुख्याध्यापक मा. श्री. पवार जी. एस. आणि केंद्रप्रमुख मा. श्री. बारगळ एल. एस. साहेब हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहून श्रीमती राठोड यांना शुभेच्छा देणार आहेत.

सराटी येथील शालेय व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती राठोड यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान या निमित्ताने केला जाणार असून, या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments