Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सावरगाव येथे उद्या 'महाराजस्व समाधान शिबीर'; एकाच छताखाली मिळणार महसूल विभागाच्या विविध सेवा!

 "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
सामान्य नागरिकांच्या समस्यांचे एकाच ठिकाणी, जलद आणि पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचे आयोजन उद्या बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील:
वेळ: सकाळी ठीक ९:०० वाजता.
स्थळ: जैन मंगल कार्यालय, सावरगाव (सावरगाव मंडळ, ता. तुळजापूर).

नागरिकांना मिळणारया प्रमुख सेवा:
या शिबिरामध्ये सावरगाव मंडळातील नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे महसूल विषयक प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
१. प्रलंबित फेरफार निकाली काढणे.
२. ७/१२ अधिकार अभिलेख दुरुस्ती (जिवंत ७/१२ मोहीम).
३. ७/१२ आणि ८-अ चे वितरण.
४. विविध प्रकारचे शासकीय दाखले एकाच ठिकाणी मिळण्याची 'एक खिडकी योजना'.
५. शेतजमीन वाटणी (कलम ८५) अर्जावर कार्यवाही.
६. रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे किंवा कमी करणे.
७. ई-मोजणी आणि ७/१२ च्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती.
८. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे लाभ मंजुरी आदेश वितरण.

प्रशासनाचा पुढाकार:
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी (धाराशिव) श्री. ओंकार देशमुख, तहसीलदार (तुळजापूर) श्री. अरविंद बोळंगे आणि उप जिल्हाधिकारी श्री. पुरुषोत्तम कोकरे यांच्यासह महसूल मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

सावरगाव मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन महसूल मंडळ सावरगाव व तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

-बातमी: 'Only न्युज धाराशिव' वेब पोर्टल.

Post a Comment

0 Comments