तुळजापूर | "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील सानंंद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे वजनदार आमदार कनुभाई करमशीभाई पटेल यांनी आज बुधवार दि.२७ रोजी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर नगरीत हजेरी लावली. आई भवानीचे दर्शन घेऊन त्यांनी देश आणि राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी साकडे घातले. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्याचे औचित्य साधून तुळजापुरातील नामांकित 'पुजारी फाउंडेशन'च्या वतीने पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या हस्ते आमदार पटेल यांचा शाल, श्रीफळ आणि आई भवानीची प्रतिमा देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
आमदार कनुभाई पटेल हे गुजरातच्या राजकारणातील एक अभ्यासू आणि लोकसंग्रह असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीवर त्यांची अथांग श्रद्धा असल्याने त्यांनी खास दर्शनासाठी हा दौरा आखला होता. मंदिरात विधीवत पूजा-अर्चा केल्यानंतर ते बाहेर आले असता, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
राजकीय आणि सामाजिक मान्यवरांची मांदियाळी
या सत्कार सोहळ्याप्रसंगी तुळजापूरचे डॅशिंग नगरसेवक विशाल (भैय्या)रोचकरी आणि पुजारी फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांनी आमदार पटेल यांचे शाल, कवड्याची माळ व आई तुळजाभवानीची प्रतिमा देऊन विशेष आदरातिथ्य केले. यावेळी त्यांच्या समवेत आलेले छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील प्रसिद्ध वकील ओमगशद बोईनवाड यांचा आई तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गुजरात आणि महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवरही अनौपचारिक चर्चा झाली.
या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे नामांकित विधीज्ञ अॅड. ओमगशद बोईनवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापू जगदे, प्रतिक रोचकरी आणि राहुल जाधव यांच्यासह स्थानिक नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे श्रद्धास्थान आहे. येथे आल्यावर मिळणारी ऊर्जा अद्भुत आहे. तुळजापूरकरांनी आणि पुजारी फाउंडेशनने केलेले आदरातिथ्य मी कधीही विसरणार नाही."
— कनुभाई पटेल (आमदार, सानंद विधानसभा, गुजरात)
या दौऱ्यामुळे तुळजापूर आणि गुजरातच्या लोकप्रतिनिधींमधील स्नेहाचे संबंध अधिक दृढ झाले असून, 'पुजारी फाउंडेशन'ने केलेल्या या आदरातिथ्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
0 Comments