Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

गरीब विद्यार्थ्यांसाठी अमेरिकन संस्थेचा मदतीचा हातसरस्वती विद्यालय तामलवाडीत शैक्षणिक साहित्य वाटप; अमेरिकेतील लेखिका के. टी. मायकल हाऊस यांच्या स्मरणार्थ उपक्रम


"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
येथील सरस्वती विद्यालयात अमेरिकेतील न्यू जर्सी येथील प्रसिद्ध लेखिका के. टी. मायकल हाऊस यांच्या स्मरणार्थ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. होनसळ येथील सामाजिक कार्यकर्ते नेताजी पवार यांनी आपल्या स्वखर्चातून हा उपक्रम राबविला.

या कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे, पर्यवेक्षक महादेव मसुते, सचिन शिंदे, रेवती पवार व कार्तिक पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. नेताजी पवार हे सरस्वती विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, गतवर्षीदेखील त्यांनी अमेरिकन लेखिकेच्या स्मरणार्थ अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले होते.

प्राचार्य सुहास वडणे यांच्या नियोजनामुळे विद्यालयाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. प्रशस्त वर्गखोल्या, सीसीटीव्ही निगराणी, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, फिल्टरद्वारे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली काळजी, विज्ञान व विविध स्पर्धा परीक्षांतील यश, महाराष्ट्र चित्रकला ग्रेड परीक्षेतील उल्लेखनीय कामगिरी तसेच क्रीडा क्षेत्रातील यश याबाबतची माहिती नेताजी पवार यांनी अमेरिकेतील संस्थेकडे पोहोचविली होती.

ग्रामीण भागातील शाळा असूनही सरस्वती विद्यालयाने केलेल्या प्रगतीचे अमेरिकन संस्थेकडून विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बसवांनाप्पा मसुते, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सचिव यशवंत अण्णा लोंढे, ज्येष्ठ संचालक मल्लिकार्जुन मसुते, अब्बासभाई पटेल, बाळासाहेब जगताप, प्राचार्य सुहास वडणे, पर्यवेक्षक महादेव मसुते आदी मान्यवरांनी अमेरिकन सामाजिक संस्थेचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments