Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

१२ वर्षांचा कायदेशीर संघर्ष संपला;तुळजापूर नगर परिषदेचे लिपिक पांडुरंग घुटे लाच लुचपत खटल्यातून निर्दोष मुक्त

.                         ॲड. दिलीप मराठे, धाराशिव 

​धाराशिव | Only  न्युज धाराशिव वृत्तसेवा 
तुळजापूर नगर परिषदेतील सहशिक्षक तथा लिपिक पांडुरंग घुटे यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या खटल्यातून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सुमारे १२ वर्षांपूर्वी दाखल असलेल्या या खटल्यातून न्याय मिळाल्याने घुटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१४ मध्ये पांडुरंग घुटे हे तुळजापूर नगर परिषदेत कार्यरत होते. यादरम्यान, नागनाथ गवळी यांच्या मुलीची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून देण्यासाठी घुटे यांनी १५०० रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याचा आरोप होता. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तत्कालीन तपास अधिकारी अश्विनी भोसले यांनी याप्रकरणी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

​न्यायालयाचा निकाल
हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश खोमणे यांच्या न्यायालयात चालला. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांनी पुराव्यांमधील त्रुटी आणि युक्तिवाद प्रभावीपणे मांडल्याने संशय निर्माण झाला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आणि सादर केलेले पुरावे तपासल्यानंतर, न्यायालयाने पांडुरंग घुटे यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची सन्मानाने निर्दोष मुक्तता केली.

​आरोपीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिलीप मराठे, ॲड. राम गरड आणि ॲड. चांद अत्तर यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली.

Post a Comment

0 Comments