Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

“तुळजाभवानी संस्थानात महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणाने देशभक्तीचा जागर”

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा १ मे १९६० हा ऐतिहासिक दिवस दरवर्षी राज्यभर ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त संस्थान परिसरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करून राज्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, लेखाधिकारी संतोष भेंकी, सिद्धेश्वर इंतुले, नागेश शितोळे, प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण, रामेश्वर वाले, अनुप ढमाले, विक्रम कदम तसेच पोलिस कर्मचारी आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️'Only न्युज धाराशिव' – जिल्ह्यातील घडामोडींचा अचूक वेध!

Post a Comment

0 Comments