Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'Only न्युज धाराशिव' विशेष वृत्तांतकाटीच्या हर्षल राऊतचे बारावीत घवघवीत यश; मिळवले ८६.१७ टक्के गुण

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील हर्षल धनंजय राऊत याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. त्याने ८६.१७ टक्के गुण मिळवून आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

हर्षल हा धाराशिव येथील प्रतिष्ठित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. परीक्षेत त्याने सर्वच विषयांत उत्तम कामगिरी केली असून विशेषतः जीवशास्त्र (Biology) विषयात ९६, रसायनशास्त्र (Chemistry) ८९ आणि इंग्रजी विषयात ८९ गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याला एकूण ६०० पैकी ५१७ गुण मिळाले आहेत.

हर्षलचे वडील धनंजय राऊत हे जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस पदावर कार्यरत आहेत, तर आई  गृहिणी आहेत. पोलीस दलात कार्यरत असलेल्या वडिलांच्या शिस्तीचे आणि आईच्या खंबीर पाठिंब्याचे हे फळ असल्याचे हर्षलने सांगितले. त्याच्या या यशाबद्दल काटी परिसर आणि पोलीस दलातून त्याचे कौतुक होत आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत किंवा वैद्यकीय क्षेत्रात नाव कमविण्याचा हर्षलचा मानस आहे.

हर्षलचे गुणपत्रक थोडक्यात:
इंग्रजी: ८९
हिंदी: ८६
गणित आणि सांख्यिकी: ७९
भौतिकशास्त्र: ७८
रसायनशास्त्र: ८९
जीवशास्त्र: ९६
एकूण टक्केवारी: ८६.१७ %

Post a Comment

0 Comments