Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजाभवानी मंदिरात खर्चिक होम-हवन बंद करा! शेतकरी कामगार पक्षाचा आक्रमक पवित्रा; प्रशासनाला निवेदन;​भक्तांच्या पैशांची उधळण थांबवून वैज्ञानिक दृष्टिकोनातून मंदिर विकास करा; तुळजापूर तहसीलदारांना निवेदन सादर


​तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
श्री तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेला अवाजवी आणि खर्चिक होम-हवन तात्काळ थांबवावा, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज आक्रमक भूमिका घेत मंदिर प्रशासन अधिकारी तथा तहसीलदार माया माने यांना निवेदन सादर करण्यात आले. भक्तांच्या दानातून आलेल्या पैशांची दिखाऊ व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या धार्मिक कर्मकांडावर उधळण न करता, मंदिराचा विकास आणि भाविकांच्या सोयी-सुविधांवर भर द्यावा, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
​
मंदिरात खर्चाची उधळण कशासाठी?
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी मंदिराचा विस्तार व नुतनीकरण २ ते ३ वेळा झाले आहे. परंतु, त्यावेळी अशाप्रकारचे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे मंत्र-तंत्र कर्मकांड करून भक्तांच्या पैशांची उधळण केली नव्हती. तरीही मंदिरातील विस्तारीत कामे विनासंकट आणि यशस्वीरीत्या पार पडली होती. मग आताच एवढा मोठा खर्च कशासाठी, असा सवाल निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम थांबवून वैज्ञानिक दृष्टिकोनातून मंदिर विकास साधावा आणि भक्तांना दर्जेदार सुख-सुविधा कशा पुरवता येतील, तसेच रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

​शेतकऱ्यांचा ७९ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
दुसरीकडे, आज तुळजापूर येथे शेतकरी कामगार पक्षाचा ७९ वा स्थापना दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ व माजी नगराध्यक्ष भाई खलील शेख यांच्या हस्ते लाल बावटा झेंड्याची पूजा व रोहण करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​निवेदनावर प्रमुख हस्ताक्षरकर्ते:
उत्तम (नाना) अमृतराव, किरण माणिकराव खपले, मारुती नाईकवाडी, कल्याणराव भोसले, कालिदास पलंगे, सदानंद पेंदे, अशोक साळुंके, बाबासाहेब  कुतवळ, चंद्रकांत सप्ताळ आदींसह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments