Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​तुळजापूर नगरपरिषदेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी; 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून अभिवादन

तुळजापूर | ' Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
​भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि 'मिसाईल मॅन' भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती तुळजापूर नगरपरिषद कार्यालयात गुरुवारी अत्यंत उत्साहात आणि आदरांजलीपूर्वक साजरी करण्यात आली. या प्रसंगी नगरपरिषदेचे गटनेते अमोलभैय्या कुतवळ यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

​डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात १५ ऑक्टोबर हा दिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. या औचित्याने आयोजित कार्यक्रमात गटनेते अमोल कुतवळ यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनप्रवासावर आणि उत्तुंग कार्यावर प्रकाश टाकला.

​'जनतेचे राष्ट्रपती' आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व
​उपस्थित उपस्थितांना मार्गदर्शन करताना अमोल कुतवळ म्हणाले, "डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे सामान्य नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी खुले केले, म्हणूनच त्यांना 'जनतेचे राष्ट्रपती' (People's President) म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी आपले उर्वरित आयुष्य अध्यापनासाठी समर्पित केले. आयआयटी (IIT) आणि आयआयएम (IIM) यांसारख्या देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत."

​कलाम यांच्या अंतिम क्षणांची आठवण सांगताना ते पुढे म्हणाले, "मेघालयची राजधानी शिलॉंग येथील 'आयआयएम' कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत ते ज्ञानाचा दीप तेवत ठेवत होते. डॉ. कलाम यांचे विचार आणि शिक्षणप्रेमी दृष्टिकोन आचरणात आणणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल."

​नगरपरिषदेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती
​या कार्यक्रमास तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे,  नगरसेवक पंडित जगदाळे, आनंद जगताप, माऊली भोसले, अक्षय परमेश्वर, किशोर साठे, श्रीकांत धुमाळ यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. कलाम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments