Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तामलवाडीसाठी माजी सैनिकाचा पुढाकार; 'बालाजी अमाईन्स'कडे मोफत दवाखाना, पाण्याची मागणी​ 'बालाजी अमाईन्स'कडे ई-मेलद्वारे निवेदन; 'आशा' संस्थेचे संस्थापक शिवाजी सावंत यांचा पुढाकार

           --माजी सैनिक शिवाजी सावंत, तामलवाडी 

काटी | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
​राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावावर ओढवलेल्या पाणीटंचाई आणि आरोग्य संकटावर मात करण्यासाठी माजी सैनिक मैदानात उतरले आहेत. 'आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे' संस्थापक अध्यक्ष व माजी सैनिक शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी गावातील स्थानिक कंपनी असलेल्या 'बालाजी अमाईन्स लिमिटेड'च्या व्यवस्थापनाकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून, पूर्वीप्रमाणे मोफत वैद्यकीय सुविधा आणि टँकरद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे.

​यंदा पावसाने दडी मारल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, हाताला काम नसल्याने गावात आर्थिक टंचाई व बेकारीचे सावट आहे. त्यातच भीषण पाणीटंचाई आणि अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या संकटात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर उपचार व शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे अत्यंत गरजेचे बनले आहे. याची दखल घेत सावंत यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) कंपनीने मदतीचा हात पुढे करावा, अशी विनंती केली आहे.

​कंपनीकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या :
​मोफत दवाखाना व आरोग्य शिबीर : तज्ज्ञ डॉक्टरांसह महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठी गावात नियमित मोफत आरोग्य तपासणी शिबीर किंवा दवाखाना सुविधा पुन्हा सुरू करावी.
​टँकरद्वारे पाणीपुरवठा : गावातील गरजू कुटुंबांची तहान भागवण्यासाठी टँकरद्वारे स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.

.    ---माजी सैनिक शिवाजी सावंत, तामलवाडी 

​"बालाजी अमाईन्स लिमिटेडने आजवर तामलवाडीच्या विकासात आणि प्रत्येक संकटाच्या काळात मोलाचे सहकार्य केले आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही कंपनी सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास आहे."
— शिवाजी रामकृष्ण सावंत, माजी सैनिक तथा संस्थापक अध्यक्ष, आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

​प्रशासनालाही निवेदनाच्या प्रती
या निवेदनाची प्रत माहितीस्तव आणि पुढील शासकीय पाठपुराव्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी, तुळजापूरचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच तामलवाडी ग्रामपंचायत कार्यालयाला पाठवण्यात आली आहे. कंपनी प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास गावातील शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळून संभाव्य रोगराई आटोक्यात येईल आणि गाव व कंपनी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट होईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments