Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकलव्यच्या मॉडेल चा दहाव्यांदा प्रथम क्रमांक

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे संपन्न झालेल्या तुळजापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रयोग प्रदर्शनात एकलव्य विद्या संकुल मंगरूळ यमगरवाडी येथील विद्यार्थिनी आरती पाटील हिने सादर केलेल्या विज्ञान मॉडेलचा तुळजापूर तालुक्यातून प्रथम क्रमांक आला ."आजी आजोबांसाठीची उपकरणे" हा प्रयोग आरती पाटील हिने सादर केला .टाकाऊ वस्तु पासून कमी खर्चात हे मॉडेल तयार करण्यात आले होते .घरात वयस्कर लोक असतात, त्यांना शौचाला बसताना व उच्च न्या त्रास होतो. त्याकरिता ज्येष्ठांसाठी हे मॉडेल बनवले आहे .ही व्हीलचेअर आहे. यामध्ये टिशू पेपर सुविधा तसेच हेल्प बेल बसवण्यात आली आहे .काही अडचण आल्यास हेल्प बेल वाजवल्यास वयस्कर लोक इतरांची लगेच मदत घेऊ शकतात. औषधे चालू असल्यास तीन वेळा औषध घेणे साठी वेगवेगळ्या रंगाच्या तीन बरण्यामध्ये औषधे ठेवण्याची सुविधा आहे .या प्रयोगाचे मॉडेल समाजातील वयस्कर लोकांना उपयोगी ठरू शकते. कुमारी आरती पाटील हिस विज्ञान शिक्षक दयानंद भडांगे ,बालाजी क्षीरसागर ,यशवंत निंबाळकर यांनी मार्ग केले .तसेच अजित पाखरे, रमेश बंडगर , प्रतिक माडे वार अमित ,माडेवार यांनी सहकार्य केले .संस्थेचे कार्यवाह विवेक अयाचित यांचे हस्ते आरती पाटील ,दयानंद भडांगे,बालाजी क्षीरसागर,यशवंत निंबाळकर यांचा सत्कार करणेत आला.आरतीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू , उपाध्यक्ष डॉक्टर अभय शहापूरकर,कार्यवाह विवेक अयाचीत ,गिरीश कुलकर्णी,शिक्षण विस्तराधिकरी मल्हारी माने, अभय कुलकर्णी,, अशोक संकलेचा, नरेश पोटे, सतीश कोळगे यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे,अण्णासाहेब कोल्हटकर,बालाजी क्षीरसागर, अण्णासाहेब मगर,दयानंद भडांगे, अनिल घुगे, अशोक बनकर ,संतोष बनसोडे, किरण चव्हाण,  ,दत्ता भोजने,शालीवाहन वाघमोडे,रेड्डी सर, माऊली भुतेकर, सविता गोरे ,प्रणिता शेटकार, निर्मला हुग्गे,यशवंत निंबाळकर, खंडू काळे ,कोंडीबा देवकर, रमाकांत पवार फुलाजी ताटी कुंडलवार, दत्ता भोजने,संगीता पाचंगे उपस्थित होते

"धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळा मध्ये एकलव्य विद्या संकुलात एकमेव अशी सुसज्य विज्ञान प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेत इयत्ता पाचवी ते दहावी वर्गासाठी आवश्यक असणारे सर्व प्रयोग  साहित्य उपलब्ध आहे प्रयोगशाळेत खगोलीय दुर्बीण डिजिटल क्लासरूम मिनी सायन्स सेंटर उपलब्ध आहे या प्रयोगशाळेचा उपयोग परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनाही होतो तुळजापूर तालुका विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत शाळेचा सतत दहा वेळा प्रथम क्रमांक आला आहे."
          दयानंद भडंगे
   विज्ञान शिक्षक

Post a Comment

0 Comments