काटी /उमाजी गायकवाड
तमाम हिंदुस्थानच्या जनतेचे गेली अनेक वर्षे केवळ स्वप्नच ठरलेले आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न येत्या 22 जानेवारीला सत्यात उतरत आहे.या मंदिराचा लोकार्पण सोहळा एक ऐतिहासिक सोहळा व्हावा अशी अपेक्षा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. त्या अनुषंगाने अयोध्येतून आलेल्या निमंत्रित आशिर्वादरुपी अक्षता व माहिती पत्रिका वाटप तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथे रविवार दि.21 रोजी सकाळी 9:30 ते 11:45 या कालावधीत प्रभू श्रीरामाच्या दिंडी द्वारे ग्रामस्थांच्या वतीने घरोघरी जाऊन श्रीराम मंदिर सोहळ्याचे अक्षता व माहिती पत्रिका वाटप करण्यात आले.
देशातील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जाणे शक्य नसल्याने नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह घरोघरी जाऊन अयोध्येतून आलेल्या अक्षता वाटप भजन गायन व टाळ मृदंगाच्या निनादात मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. तसेच हा प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा प्रत्येकांना पहाता यावा यासाठी अयोध्येतील थेट प्रक्षेपण सोहळा सोमवार दि. 22 रोजी नागरिकांना दाखविण्यात येणार आहे.
या दिंडीत महिला, पुरुष, अबालवृद्धासह ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचा सहभाग होता.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments