काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे दिनांक 22 रोजी अयोध्येतील प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाने मंगरुळ नगरी प्रभू श्रीरामाच्या 'रामनामा' ने दुमदुमून गेली होती. येथील ग्रामस्थांनी प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला.
500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याअनुषंगाने घेण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात मंगरूळ येथील नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह पाहयला मिळाला.
प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना दिनानिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून रामनामाच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या निनादात,भजन गायनामध्ये "राम फेरी" काढण्यात आली. सोमवारी सायंकाळी पंचायत समितीचे माजी उपसभापती चित्तरंजन सरडे यांच्या वतीने भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप व महादेव मंदिरात 'श्रीराम' नामोल्लेख करण्यात आलेल्या असंख्य दिव्यांची सजावट करण्यात आली होती. अतिशय आकर्षक व देखण्या अशा या दिपोत्सवाने मंदीर परिसरात भक्तीमय वातावरण पसरल्याने येथील वातावरण राममय झाले होते.
या धार्मिक कार्यक्रमात गावातील महिला, पुरुष, अबालवृद्धासह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments