Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

येणेगुर येथील श्रीराम प्रतिष्ठापना आनंदोत्सव सोहळा जय श्रीराम जयघोषाने दुमदुमला


येणेगुर/ योगेश  पांचाळ
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे ता.22 वार सोमवार रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त येणेगूर येथील श्री हनुमान महिला भजनी मंडळ व राम भक्तांनी "श्रीराम जय राम जय जय राम" गजर केला.  
  तसेच अयोध्या वरून आलेल्या अक्षदा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुपारी.12 वाजून 29 मिनिटांनी श्री राम मंदिरात व अशोक नगर हनुमान मंदिरातही श्रीराम प्रभूच्या प्रतिमेचे पूजन करून अक्षदा टाकण्यात आल्या. यावेळी येणेगूर नगरी श्रीरामाच्या घोषाने दुमदुमून गेली.व दुपारी 4 वाजता श्रीराम प्रभूची मिरवणूक श्री हनुमान मंदिर अशोक नगर येथून आनंदीमय वातावरणात राम भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.व श्रीराम मंदिरापाशी समारोप केला.
तब्बल पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर साकार झाल्यामुळे,येणेगूर येथील युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली, या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे गावातील ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर, महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, करीबसवेश्वर मठ, श्रीराम मंदिर, मराई मंदिर,अशोक नगर हनुमान मंदिर, तसेच  विद्युत रोषणाई तसेच फुलांनी सर्व मंदिरे सजविण्यात आली होती. 

प्राणप्रतिष्ठासोहळ्यासाठी नगरीमध्ये भाविकांची गर्दी झाली होती.प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आरती झाली, तसेच श्री करीबसवेश्वर मठ व श्रीराम मंदिर येथेही राम भक्तानी महाप्रसादाचे आयोजन केले.व जय हनुमान गणेश मंडळाच्यावतीने गावाबर घर पोच महाप्रसाद वाटप व सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्तम सगर, राजेंद्र बनसोडे, विठ्ठल जमादार,नारायण सगर, सिद्धेश्वर हलमडगे,विश्वनाथ स्वामी,लक्ष्मण लाळे,पप्पू हिप्परगे, महेश कुंभार, रत्नदीप कुलकर्णी, गणेश बिराजदार,संजय गाडेकर, विवेकानंद हंगरगे,सागर पाटील,सचिन गुंजोटे,अमोल बिराजदार,साई पाटील,उमेश धामशेट्टी, मंगेश बरबडे, ओमकार गुंजोटे, राजेश जोजन, हरि कलशेट्टी,हरी कलशेट्टी,अमित माळी,आकाश कागे,महेश माळी,अजय इंगवे, योगेश पांचाळ,धनराज माळी महिला, पुरुष, ग्रामस्थ आदी श्रीराम भक्तांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
Only न्युज तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments