येणेगुर/योगेश पांचाळ
उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे अयोध्येतील भव्य मंदिरात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा निमित्त सुपतगाव येथील ग्रामदैवत श्री मारुती मंदिर भजनी मंडळ व राम भक्तांनी "श्रीराम जय राम जय जय राम" नामजप केले, गावातून प्रभू रामचंद्राची प्रतिमा घेऊन मिरवणूक काढण्यात आली.
तसेच अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले, अयोध्या वरून आलेल्या अक्षदा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी मंदिरावर अक्षदा टाकण्यात आल्या. यावेळी सुपतगाव नगरी श्रीरामाच्या घोषाने दुमदुमून गेली.
500 वर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर साकार झाल्यामुळे सुपतगाव येथील युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली, या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे गावातील ग्रामदैवत मारुती मंदिर, तसेच महादेव मंदिर विद्युत रोषणाई तसेच फुलांनी सर्व मंदिरे सजविण्यात आली होती.
प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी नगरीमध्ये भाविकांची गर्दी झाली होती, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आरती झाली, तसेच नितीन गिरी यांच्यावतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, महिला पुरुष भाविक, राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव मंडळाचे राजेंद्र लामजणे, राम जगदाळे, राजेंद्र करके, कृष्णात बडोरे, चंद्रकांत हेंडले, परमेश्वर लामजणे, राजेंद्र बिराजदार, काशिनाथ करके, नितीन गिरी, योगेश गुरव यांच्यासह गावातील सर्व युवकांनी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments