Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मुरुम येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिरात १०५ नागरिकांनी घेतला लाभ

           
मुरूम/प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले
 उमरगा तालुक्यातील  मुरुम येथील डागा हॉस्पिटलमध्ये आयोजित मंगळवार (ता. २३) रोजी डागा हॉस्पिटल व उमरगा येथील ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील रुग्णांकरिता मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी भगवान धन्वंतरी प्रतिमेस पुष्पहार घालून हृदयरोग तज्ञ डॉ. जयभारत भालके, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, माजी प्राचार्य दत्ता इंगळे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, स्त्रीरोग तज्ञ डॉ. शिल्पा डागा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, राजशेखर मुदकण्णा, डॉ. बळवंत चव्हाण, दत्ता चटगे, विठ्ठल पाटील आदींनी अभिवादन करून या सर्वांच्या प्रमुख उपस्थित शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. जयभारत भालके यांनी  मोफत ईसीजी, शुगर तपासणी, सिटीस्कॅन व आवश्यक त्या उपाययोजना या संदर्भात रुग्णांची तपासणी करून सल्ला व औषधोपचार केला. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांना ज्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, दम व थकवा येणे, अस्वस्थ वाटणे, छातीमध्ये दुखणे, छाती धडधडणे, अचानक घाम येणे, चक्कर येणे, पाय सुजणे आदी लक्षणे जाणवल्यास त्यांनी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केले. यावेळी असिस्टंट तज्ञ रविकुमार ए., कॅथलॅब असिस्टंट महेश निकम, एसीजी तज्ञ आशाताई गायकवाड, राजेश्वर मुदकण्णा, पीआरओ पलश शेंडगे, फार्मासिस्ट शाहरुख मुगळे, ओमकार कुलकर्णी, आफरीन शेख आदींनी पुढाकार घेऊन शिबिर यशस्वी केले. या शिबिरामध्ये परिसरातील शंभरहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. 

मुरुम, ता. उमरगा येथील डागा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करताना डॉ. जयभारत भालके, डॉ. नितीन डागा, डॉ. शिल्पा डागा, डॉ. बळवंत चव्हाण व अन्य.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments