काटी/उमाजी गायकवाड
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तुळजापूर तालुक्यातील काटी येथून मराठा बांधव गुरुवार दि. (25) मुंबईकडे रवाना झाले.
तुळजाभवानीचा आशिर्वाद घेऊन व तुळजापूरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन काटीतील प्रदीप साळुंके, पत्रकार उमाजी गायकवाड, चंद्रकांत काटे, रणजित देशमुख, राहुल जाधव (मोर्डा), अमोल देशमुख, बबन शिंदे, शाम चव्हाण, मधुकर साळुंके हे मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
यावेळी मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठासह आरक्षणासंदर्भात जोरदार घोषणा देत तुळजापूरातून पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष सज्जनराव साळुंके,
मराठा क्रांती मोर्चाचे महेश गवळी, पुजारी मंडळाचे सदस्य अविनाश गंगणे यांनी तर काटीतून अनिल गुंड, मकरंद देशमुख,राजु साळुंके, साहेबराव देशमुख, संजय महापूरे, संग्राम हंगरकर, वैजिनाथ सातपुते, हेरार काझी, तबारक इनामदार, मंजुर कुरेशी, गफार शेख, अमर देशमुख, सद्दाम शेख, संजय साळुंके, रफीक कुरेशी यांनी निरोप देऊन आरक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
Only न्युज तुळजापूर
9923005236
0 Comments