Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'जि. प.प्रशाला कन्या मुरूम शाळेचे क्रीडा व साहित्य क्षेत्रात घवघवीत यश'

मुरुम/ प्रतिनिधी 
जि.प.धाराशिवमार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि.प.कन्या प्रशाला मुरूम या शाळेचा १७ वर्षाखाली मुलींच्या कबड्डी संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून, संघाचे जिल्हास्तरावर निवड झाली आहे.तसेच १४ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. वैयक्तिक मैदानी स्पर्धेत आरती विजय पवार हिने लांब उडी, उंच उडी, 400 मीटर धावणे व रिले रेसमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. पायल मोहन वासुदेव हिने शंभर मीटर धावणे, व रील रेस मध्ये प्रथम तर रोहिणी किरण जाधव हिने गोळा फेक व भालाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. ऐश्वर्या तुकाराम कांबळे या विद्यार्थिनी थाळीफेक मध्ये द्वितीय तर संजना राठोड हिने   हार्डल्समध्ये तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.या विजेत्या विद्यार्थ्यांना लोहारा उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
       
तसेच अभिजात साहित्य मंडळ उमरगा, रोटरी क्लब उमरगा व गट शिक्षण कार्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या विद्यार्थी साहित्य संमेलनामध्ये नंदिनी किरण जाधव हिच्या 'मोल संस्कारा'च्या या कथेला प्रथम क्रमांक मिळाला. तर वर्षाराणी लक्ष्मण अंबुसे हिला निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला. तसेच स्नेहल शिवराज येवले हिने काव्यवाचन स्पर्धेत  कविता सादर केली. या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये बक्षिसाचे वाटप करण्यात आले.
     
या सर्व यशस्वी खेळाडू,साहित्यिक विद्यार्थ्यांना सोनाली विजय कलशेट्टी, डॉ.वंदना जयराम जाधव, मंकावती बळीराम कांबळे, हरी ग्यानबा शेके, बालाजी विष्णू गायकवाड, महादेव कुनाळे, स्वप्निल पाटील, रुक्मिणी बंदीछोडे इत्यादींचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक नुरअहमद घाटवाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुंडू पुराणे, कन्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता साळुंखे तात्याराव जाधव ललिता पवार यांनी विजेत्या विद्यार्थाचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments