Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीमध्ये कार सेवकांचा झाला गौरव; प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा दिवशी दिंडी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन

काटी/उमाजी  गायकवाड
22 जानेवारी रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होणार आहे.

त्याअनुषंगाने  तुळजापूर तालुक्यातील काटी येथे ज्ञानेश्वर गुरव व हभप सुनिल महाराज ढगे यांच्या पुढाकाराने अनुलोम संस्थेच्या वतीने आयोजित अयोध्येतील विवादित ढाचा पाडण्यासाठी गेलेल्या हिंदू  प्रेमी कार सेवकांचा विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार केला. 

प्रारंभी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख व माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मुर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमात अनुलोम संस्था व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने 
देविदास रामचंद्र शिंदे ,कार सेवक कै.पंडीत गोविंद गवळी यांच्या पत्नी सुमन पंडीत गवळी, कै. शिवाजी ताटे यांच्या पत्नी ग.भा.प्रमिलाताई शिवाजी ताटे, नागनाथ लक्ष्मण हेडे, कार सेवक प्रकाश पांगे यांचे पुतणे महेश चंद्रकांत पांगे, कालिदास देविदास शिंदे या कार सेवकांचा तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे वारकरी संप्रदायातील हभप सुनील महाराज ढगे,गणपत श्रीपती चिवरे, श्रुती सुहास कुलकर्णी, वसुधा विलास कुलकर्णी,पंडीत बामणकर, (वाणेवाडी) कैलास जाधव (खुंटेवाडी) अनुलोम संस्थेचे भाग सेवक श्रीकांत तांबे, लिंबराज शिनगारे, वाणेवाडी यांचा पुष्पहार, प्रभू राम संदेश पत्र व कायमस्वरूपी  आठवण राहण्यासाठी व नित्य 
 पुजेसाठी कोदंडधारी प्रभू श्रीरामाची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विवादित ढाचा पाडताना उपस्थित असलेले आपले पती अशा गौरव  सोहळ्या दरम्यान पंडीत गोविंद गवळी, शिवाजी ताटे हे वैकुंठवासी झाल्याने त्यांच्या पत्नी सुमन पंडीत गवळी व प्रमिलाताई शिवाजी ताटे यांना अश्रू अनावर झाले होते.

22 जानेवारी रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळा दिवशी गावातील  प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळा व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी हभप सुनिल महाराज ढगे यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयाजी देशमुख यांनी केले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी  चेअरमन सयाजी देशमुख, माजी  सरपंच आदेश कोळी,  प्रदीप सांळुके, भैरीनाथ काळे, सोसायटीचे चेअरमन संजय साळुंके, मंकरद देशमुख, प्रकाश गाटे, अनिल गुंड, काकासाहेब रोडे जयाजी देशमुख, सुहास  उर्फ पिंटू कुलकर्णी, ज्ञानेश्वर  गुरव, मनोज  हंगरकर,धनाजी ढगे, सुर्याजी चिवरे, सपंत पंखे,अविनाश देशमुख, रामेश्वर लांडूळकर, तानाजी चिवरे, वसंत हेडे, रामहारी थोरबोले,अशोक गवळी सुनिल गायकवाड, काकासाहेब  रोडे,शिवाजी चिवरे, कल्याण गाटे, बाळासाहेब मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments