Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

काटी/उमाजी गायकवाड
  तुळजापूर तालुक्यातील काटी  येथे शुक्रवार दि. 26 रोजी सकाळी येथील माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 या वेळी गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्रीय कन्या शाळा, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, येडेश्वरी कन्या  प्रशाला, मनाल इंग्लिश मिडीयम स्कूल, तुळजा भवानी इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या  वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

येथील माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या कार्यालया समोर  माजी सैनिक तथा माजी सैनिक समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष संताजी थिटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. 

या वेळी माजी सैनिक समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष संताजी थिटे, माजी सैनिक सुभेदार मेजर जगन्नाथ खपाले, इजदानी बेग, विलास गाटे, श्रीकांत गाटे, राठोड, क्षिरसागर, गावडे आदींसह माजी सैनिकांच्या पत्नी, ग्रामस्थ, राजकीय  पदाधिकारी यांनी उपस्थित राहून ध्वजाला मानवंदना दिली.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments