काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दि.26 रोजी उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल जरासंध मिसळ यांची निवड करण्यात आली. तर उद्घाटक म्हणून मंगरूळ बिटचे विस्तराधिकरी मल्हारी माने व प्रमुख पाहुणे म्हणून नांदुरी केंद्राचे केंद्रप्रमुख संजय वाले, सुरेश कोकरे, जि.प.प्रा.शा. कुंभारीचे मुख्याध्यापक इर्शाद शेख, सहशिक्षक विजयकुमार गायकवाड, जि.प.प्रा.शा कोरेवाडीचे मुख्याध्यापक नागनाथ वडणे , कदमवाडी ग्रामपंचयत सदस्य ज्ञानेश्वर कदम, सौ.जयश्री साळुंके, सौ.मंगल शितोळे, कृषी सोसायटी चेअरमन सौ. सुरेखा नागनाथ कोले, ज्येष्ठ नागरिक मच्छिंद्र मोरे, सूर्यकांत पाटील गुलाब वडणे, प्रभाकर घाडगे,
किसन शिंदे यांची निवड करण्यात आली.
या सर्वांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रपट गीते शेतकरी गीत, विनोदी गीते, बालगीते, कोळीनृत्य, गोंधळ गीत अशा विविध कलागुणांचा आविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
17000 हजारांची बक्षीस वितरण
या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गावकऱ्यांकडून एकूण रोख बक्षीस 17000/- अक्षरी एवढी विक्रमी रक्कम जमा करुन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. भुतेकर सुरेखा रमेश (शिक्षिका) व आभार थोडसरे राहुल किसन (मुख्याध्यापक) यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका सौ.स्नेहा सिध्देश्वर कदम, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विठ्ठल मिसाळ व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच, ग्रामपंचायत कर्मचारी मारुती उत्तम पवार, जय हनुमान गणेश तरुण मंडळ, व सर्व पालक, समस्त गावकरी मंडळी कदमवाडी यांनी परिश्रम घेतले.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments