काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी ते बार्शी तालुक्यातील सारोळा या दोन गावांना जोडणारा जवळपास 1 किलोमीटर डांबरीकरण कामाला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिफारशीमुळे
50/54 अंतर्गत डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बार्शी तालुक्यातील सारोळा गावचा दळणवळणासाठी काटी गावाशी नेहमी संपर्क असतो. तसेच काटीतील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी सारोळा गावाजवळील परिसरात आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक असते. सारोळा येथील नागरिकांनी व वाहतूकदारांनी अनेकदा मागणी केली होती.अखेर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिफारशीमुळे काटी-सारोळा 50/54 अंतर्गत 30 लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन काटीचे लोकनियुक्त सरपंच पती तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सारोळाचे माजी पंचायत समितीचे सदस्य विलास गाटे, सारोळाचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच बाळराजे गाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी काटीचे लोकनियुक्त सरपंच पती तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सारोळाचे माजी पंचायत समितीचे सदस्य विलास गाटे, सारोळाचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच बाळराजे गाटे, काटीचे उपसरपंच जुबेर शेख, ग्रा.पं.सदस्य चंद्रकांत काटे, भैरीनात काळे,अमोल गावडे,सुनील गायकवाड,सुशांत काकडे,सुधाकर जाधव,किरण गाटे, शत्रगून काळे,शंबुदेव गाटे, नितीन गायकवाड,विजय महापुरे,आदीसह ग्रामस्थ उपस्थितीत होते.
0 Comments