हभप बाबुराव माळी महाराज व अरुण पवार यांच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करताना उपस्थित मान्यवर....
तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथे मंगळवार दि. 18 मार्च ते सोमवार दि. 24 मार्च या कालावधीत एकनाथ शष्टी निमीत्ताने श्री जानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या कालावधीत दररोज काकडा आरती, श्री मारुती व विठ्ठलरूक्मीणों अभिषेक, माऊली पुजा, ज्ञानेश्वरी वाचन, गाता भजन, प्रवचन, रामकृष्णहरिजप, हरिपाठ, जागर, तसेच दररोज सायंकाळी
या सप्ताहात हभप राम महांकराज महाराज, होनाळा,गुरूवर्य ह.म.म. गोपाळ (आण्णा) वासकर महाराज पंढरपूर,,ह.भ.प. लिंबराज महाराज कास्ती, ह.भ.प. लक्ष्मण चव्हाण महाराज सोलापूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज संस्थान माकणी, ह.भ.प. भगवंत चव्हाण महाराज माळखंबी, ह.भ.प. अभंग महाराज कुमठा या नामवंत किर्तनकारांचा किर्तन सोहळा पार पडला. त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या सप्ताह सोहळ्यात येथील वातावरण धार्मिक बनले होते.
या सप्ताहात धारूर,होनाळा, कामठा,इंगरगा (तुळ), खंडाळा (लाख),आपसिंगा, तीर्थ (बु.), कसई, मोर्डा, तुळजापूर (खुर्द) काक्रंबा, बामणी, कामठा,बावी, तडवळा येथील भजनी मंडळांनी भजन सेवा दिली.
काल्याचे किर्तन व काला वाटप ह.भ.प. बापुराव रानबा माळी यांच्या सुश्राव्य किर्तनाने व महाप्रसादाच्या वाटपाने अतिशय धार्मिक वातावरणात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
25 ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप
या सप्ताह सोहळा दरम्यान येथील हे.भ.प. बाबुराव माळी महाराज व अरुण पवार यांच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भाविकांना 25 ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्यात आले.यावेळी सर्जेराव सातपुते, माजी सरपंच सुमंत कोळेकर, माजी सरपंच बाबू मदने, प्रभाकर जाधव,राहुल जाधव, महेश सातपुते, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण सातपुते, तानाजी सातपुते आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments