Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव येथील सकल मराठा समाज मोफत वधूवर मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

धाराशिव/प्रा.अभिमान  हंगरकर 
धाराशिव येथील सकल मराठा समाज मोफत वधुवर पालक मेळावा आयोजित करण्याबाबत शुक्रवार दि 21 रोजी सकाळी 11 वा स्वयंवर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक, बार्शी नाका या ठिकाणी बैठक घेण्यात आली.

या बैठकीत प्रथम 13 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या  वतीने घेण्यात येणाऱ्या मोफत वधु वर सूचक मेळावा संदर्भात आढावा घेण्यात आला.या मेळाव्यात साधारण अपेक्षित किती प्रतिसाद मिळेल यावरही चर्चा झाली. या वधू वर मेळाव्याची जवळपास सर्व तयारी पूर्ण होत असून ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

या मेळाव्यास वधू वर पालकांचाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
या वेळी शिवश्री अशोक गायकवाड,प्रा.अभिमान हंगरगेकर,अशोक चव्हाण,अर्जुन जाधव,अशोक ठोंबळ,अमोल निंबाळकर,प्रा नवनाथ पवार,माजी गटशिक्षणाधिकारी राजू तांबे,विजयकुमार पवार, आण्णासाहेब कदम,दत्तात्रय भोसले,राजाभाऊ जगताप, सतीश पवार,चंद्रसेन देशमुख,सुभाष जाधव, लखन मुंडे,अर्जुन साळुंके,रमेश साळुंके आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments