तुळजापूर/उमाजी गायकवाड
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेल्या ऐतिहासिक चवदार तळे येथे समाजवादी पार्टीच्या वतीने व समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आमदार अबु आसिम आझमी यांच्या प्रमुख उपस्थितीत इन्साफ यात्रेनिमित्त तुळजापूर शहरातील समाज वादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा देवानंद रोचकरी यांनी उपस्थितीती लावून अभिवादन केले.
चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला होता. इन्साफ यात्रेनिमित्त समाजावादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा तुळजापूर शहरातील कृष्णा देवानंद रोचकरी यांनी ‘समतेचे प्रतीक’ असलेल्या चवदार तळ्यास भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी समाज वादी पार्टीचे अध्यक्ष आमदार अबु आझमी, युवक प्रदेशाध्यक्ष कृष्णा रोचकरी,आबु डोंगरे, दिपक गायकवाड, राहुल जाधव (मोर्डा), परवेझ सिद्दीकी, डॉ . राऊफ शेख, अनिस अहमद, राहुल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments