Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पूजारी नगर सोसायटीत नैसर्गिक रंंगाचा वापर करून रंगपंचमी साजरी

तुळजापूर:- शहरातील पूजारी नगर सोसायटी परिसरात बुधवार 19 रोजी पारंपारिक पध्दतीने नैसर्गिक रंंग वापरून आनंदी वातावरणात रंगपंचमी सण साजरा करण्यात आला.

पूजारी नगर सोसायटी फाउंडेशनच्या आधारस्तंभ शुभांगी गणेश पूजारी यांच्या पुढाकाराने महिला वर्गासाठी वंश लॉन्स येथे संगीतमय जल्लोषात एकमेकांना रंग लावत रंगपंचमी साजरी करण्यात आली.

फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो.

अलीकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात. रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजतात. ग्रामीण भागातही मोठया प्रमाणात रंगपंचमी अबाल वृद्ध खेळून आपला आंनद व्यक्त करतात.


Post a Comment

0 Comments