Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मराठा आरक्षण मिळाल्याने तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथे शनिवार दि.27 रोजी सकाळी मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने फटाक्यांच्या आतषबाजीत गावात एकमेकांना  पेढे भरवून जल्लोष साजरा केला.

शनिवारी सकाळी 9 वाजनेच्या सुमारास नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची छोटेखानी जाहिर सभा झाली. त्याच दरम्यान खुंटेवाडी  येथे मराठा समाज  बांधवांकडून फटाक्यांच्या  आतषबाजीत जल्लोष साजरा केला.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर धडकण्यापूर्वीच शनिवार  दि. 27 जानेवारीला पहाटेच्या सुमारास मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढला. 

ओबीसीच्या नोंदी आढळलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकडे निघालेली पदयात्रा बघून राज्य सरकारनेही तातडीने पावले उचलली आणि मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला. 

मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याने खुंटेवाडी येथील 
मराठा समाजबांधवांकडून फटाक्यांच्या आतषबाजीत पेढे  वाटून जल्लोष साजरा केला. त्याच बरोबर मराठा योध्दा यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षणासाठी मुंबईला गेलेल्या खुंटेवाडीतील
शरद कदम, कल्याण कदम, स्वागत कदम, बाबू जाधव, विशाल जाधव यांचाही सरपंच महादेव जाधव  यांच्यासह ग्रामस्थांनी यावेळी फेटा घालून सत्कार केला.

यावेळी सरपंच महादेव जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, ग्राप सदस्य कैलस, अच्युत कदम,आनंद जाधव, राजेश जाधव, अंगद कदम, उत्रेश्वर जाधव, विकास जाधव, हरिभाऊ जाधव,आकाश जाधव, समाधान जाधव, संजय जाधव, काकासाहेब जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments