काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि.27 रोजी सकाळी मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने फटाक्यांच्या आतषबाजीत येथील बाजार चौकात जल्लोष साजरा केला.
शनिवारी सकाळी 9 वाजनेच्या सुमारास नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची छोटेखानी जाहिर सभा झाली. त्याच दरम्यान काटी येथे मराठा समाज बांधवांकडून फटाक्यांच्या आतषबाजी जल्लोष साजरा केला.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर धडकण्यापूर्वीच शनिवार दि. 27 जानेवारीला पहाटेच्या सुमारास मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढला.
ओबीसीच्या नोंदी आढळलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकडे निघालेली पदयात्रा बघून राज्य सरकारनेही तातडीने पावले उचलली आणि मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला.
मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याने काटीतील मराठा समाजबांधवांकडून फटाक्यांच्या आतषबाजीत पेढे वाटून जल्लोष साजरा केला. त्याच बरोबर मराठा योध्दा यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षणासाठी मुंबईला गेलेल्या प्रदीप साळुंके, अमोल देशमुख, रणजित देशमुख, चंद्रकांत काटे,बबन शिंदे यांचाही यावेळी फेटा घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, प्रकाश सोनवणे, प्रकाश गाटे, सतिश देशमुख, धनाजी गायकवाड, प्रदीप साळुंके, अमोल देशमुख, रणजित देशमुख, चंद्रकांत काटे,बबन शिंदे, अभिमान बामणकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल गावडे, सुनिल गायकवाड, बाळासाहेब मासाळ, प्रकाश गावडे, वैभव साळुंके, शंभर साळुंके, सुनिल गुंड, प्रभाकर साळुंके, कांता आबा साळुंके, राजु वाडकर, विकास साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments