Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची तुळजापूर मधील रामदरा तलावास भेट! महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धाराशिवला 12 महिने पाणी मिळणार

तुळजापूर/प्रतिनिधी 
कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, महाराष्ट्रात एकिकडे तीव्र दुष्काळ तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी  परिस्थिती निर्माण होत असल्याने अशावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाचवेळी दोन्ही क्षेत्रांना  दिलासा देणाऱ्या या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून साकारण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स  डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत येणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना दिलासा देणारा महत्वकांक्षी प्रकल्प धाराशिव जिल्ह्यासाठी वरदान ठरणार आहे. यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील हेही  प्रयत्नशील होते. त्याचबरोबर मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सेवानिवृत्त वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी जागतिक बँकेने दिलेल्या निधीचे योग्य विनियोगाच्या अनुषंगाने पुरनियंत्रण प्रकल्पाअंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांचे सविस्तर सादरीकरण केले होते. यासाठी प्रवीणसिंह परदेशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने साकारण्यात  येणाऱ्या प्रकल्पास बुधवार दि. 14 रोजी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी तुळजापूर मधील रामदरा तलावास भेट देऊन त्यांनी कृष्णा -मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. 

कोल्हापूर सांगली येथे येणाऱ्या पुराचे पाणी बोगद्यामार्फत धाराशिवला वळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धाराशिवला 12 महिने पाणी उपलब्ध होणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली.

जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधी भेटीदरम्यान मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सेवा निवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी,आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, तहसीलदार अरविंद कोळंबे 
व नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments