काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत मंगळवार दि. 13 रोजी शाळेत कृतीशील शिक्षण देणारे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव द्यावेत या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 'आनंद बाजार' चे आयोजन केले होते.
या 'आनंद बाजारात' शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क गुलाबजाम, इडली सांगर, ढोकळा, भजे, वडा, समोसे, भेळ आदी खाद्य पदार्थ स्वतः बनवून 'आनंद बाजार' भरवून आप आपल्या स्टॉलवर स्वतः बनवलेल्या पदार्थ्यांची विक्री करण्याचा आनंद लुटला. उपस्थितांनी या आनंद बाजारातून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थ्यांची खरेदी करून खाद्य पदार्थांवर ताव मारला. अवघ्या दिड दोन तासात विद्यार्थ्यांनी व्यवसायिक अनुभव अनुभवून व्यवसायातील आर्थिक उलाढालीचा अनुभव घेतला.
यावेळी उपसरपंच जुबेर शेख, उद्योजक सत्यजीत देशमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत चिवरे, उपाध्यक्ष सुनिल गायकवाड, प्रशालेतील मुख्याध्यापक कोळी, सहशिक्षक रसाळ, भूमकर, भोसले, सुरवसे,श्री कदम, श्री पांगे, इंगळे, पंकज काटकर, किरन इगवे, श्रीमती पवार मॅडम , सय्यद मॅडम, क्षिरसागर मॅडम, कांबळे मॅडम व विद्यार्थी व माता पालक उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments