मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन इंग्रजी माध्यम शाळेत दि.२४ वार शनिवार रोजी वार्षिक स्नेह सम्मेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम सोहळा आनंदी वातावरनात संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगर विकास शिक्षण मंडळ सचिव व्यंकटराव जाधव यांची उपस्थिती होती. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक सपाटे, प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य सचिदानंद अंबर, सामाजिक कार्यकर्ते बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ.रामलिंग पुराणे, प्रतिभा इंग्रजी शाळेचे प्रिन्सिपल अनुराधा जोशी, पुरुषोत्तम बारवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती, शिक्षणमहर्षी चैतन्यमूर्ती कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन संपन्न झाला. यावेळी इयत्ता नर्सरी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी शाळेतील आदर्श विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल शिक्षकांचा, स्कुल बस वाहकाचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्वागत गीताने वार्षिक स्नेह सम्मेलनास सुरुवात झाली.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी हिंदी,मराठी गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेह सम्मेलनाचे आयोजन केले जाते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments