मुरुम /प्रतिनिधी
भारत शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि ग्रामीण कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त कवी बालाजी इंगळे यांना भारत शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने माजी विद्यार्थी आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात श्री इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी, कवी आणि साहित्यिक यांना मराठी भाषा संवर्धन होण्यासाठी आणि काव्य व साहित्य लिखाण करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. यासाठी भारत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम श्री इंगळे यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील या योगदानाची आणि या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन श्री बालाजी इंगळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
उमरगा सारख्या ग्रामीण भागात विविध आठ प्रकारचे कविता संग्रह , कादंबरी, ललित साहित्य आणि संपादित साहित्य त्यांनी प्रकाशित केले आहे.
यामध्ये झिम पोरी झिम या बालाजी इंगळे यांच्या कादंबरीस एकूण सहा पुरस्कार आणि मेल नाही अजून आभाळ या कवितासंग्रह पाच पुरस्कार प्राप्त झाले आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या अभ्यासक्रमात बालाजी इंगळे यांच्या साहित्याचा आणि कवितेचा समावेश आहे.
तसेच सहावीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात जिम पोरी जिम या कादंबरीचा उतारा समावेश आहे. मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी धाराशिव जिल्ह्याचे कवी संमेलनाचे नेतृत्व श्री इंगळे करीत आहेत. अशा राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक आणि साहित्यिक, कवी बालाजी इंगळे यांचा विशेष सत्कार सन्मानपत्र देऊन भारत शिक्षण संस्था अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष श्री अश्लेष भैया मोरे, सचिव पद्माकर हराळकर काका, सहसचिव डॉक्टर सुभाष वाघमोडे, प्रा सुरेश दाजी बिराजदार, श्री सुनील माने आणि सर्व संचालकांच्या वतीने वतीने करण्यात आला.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments