Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्र भूषण द्या; पांगरदरवाडी ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर, राज्यपाल,मुख्यमंत्री यांच्याकडे ठराव सादर

काटी/उमाजी गायकवाड
मराठा आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांना सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल शासनाने जरांगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्याची मागणी तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

यासंदर्भात येथील गावाकऱ्यांनी ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर केला असुन त्याची प्रत राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केली आहे. जरांगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी करणारी ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे. 

मराठा समाजासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक आरक्षणासाठी मराठा  योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन केले याचे फलित म्हणून राज्य शासनाने मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यासाठी जरांगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.उपसरपंच सोमनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ग्रामसभा आयोजित केली होती. यामध्ये गावचे पहिले सरपंच सुभाष विठोबा शेळके यांनी हा मुद्दा सुचवला व त्यास गणेश हरिदास गायकवाड यांनी अनुमोदन देऊन हा ठराव बहुमताने पारित करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे ऑनलाईन इमेल ने या ठरावाची प्रत पाठवण्यात आली आहे.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments