उमरगा/प्रतिनिधी
भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जे नेतृत्व लागते ते तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत करण्यात येते. या योजनेतील स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यासाठी स्वयंसेवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन नेतृत्च गुणांचा विकास गरजेचे आहे, असे मत प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. किरणसिंग राजपूत यांनी केले. नाईक नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिरात ग्रामस्वच्छतेत युवकांचे योगदान या विषयावर शनिवारी ( ता.१०) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विनायक रासुरे होते. यावेळी प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. सोमनाथ बिरादार, प्रा. सोमनाथ व्यवहारे, प्रा. राजकुमार तेलंग, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अशोक बावगे, डॉ. प्रकाश कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉ. राजपूत पुढे म्हणाले, जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आजच्या युवकांमध्ये आहे. भारतात कौशल्य धारण केलेले सर्वाधिक गुणी विद्यार्थी आहेत. समाजाप्रती निष्ठा असणारा युवा वर्ग तयार करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे. युवकांनी पर्यावरण, कौशल्य विकास, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासारख्या विषयांवर काम करण्याची गरज आहे, असे ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. विनायक रासुरे यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. शिला स्वामी तर आभार डॉ. विलास खडके यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.
नाईक नगर, ता. उमरगा येथे आयोजित व्याख्यानाप्रसंगी डॉ. किरणसिंग राजपूत बोलताना डॉ. विनायक रासुरे, डॉ. नागनाथ बनसोडे, प्रा. अशोक बावगे, डॉ. प्रतापसिंग राजपूत व अन्य.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments