काटी/उमाजी गायकवाड
लोकसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होणार असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या आणि खासदार निधीतून मंजूर झालेल्या 43 लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण व नवीन सुरु करण्यात आलेल्या विकास कामांचे स्थानिक विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भुमिपूजन करण्यात आले.
सध्या लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील, त्यानंतर विधानसभेच्या आणि त्यानंतर जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांचा सपाटा सुरु आहे.
धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सावरगाव येथील विकास कामांसाठी 43 लाख रुपये मंजूर झाले असून या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कामामध्ये प्रामुख्याने नागरी सुविधा अंतर्गत मंजूर झालेल्या माळी गल्लीतील प्लॉटिंगमध्ये 10 रुपयांचा सिमेंट रस्ता, खासदार निधीतील 5 लाखांच्या निधीतील तानाजी चौधरी घर ते हिंदू स्मशानभूमी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. तर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागामार्फत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नातून 5 लाख मंजूर झालेल्या निधीतून कुंडलिक करंडे घर ते रेवापा धडके घर सिमेंट रस्ता, 5 लाखांच्या सुभद्राबाई शिंदे घर ते धर्मा केरबा करंडे घर सिमेंट रस्ता, व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जनसुविधतील 5 लाखांच्या निधीतील महारुद्र अक्कलकोट घर ते कचुर सय्यद घर सिमेंट रस्ता, तांडा सुधार योजनेतून मंजूर झालेल्या 6 लाखांच्या निधीतील सुनील गवळी घर ते ज्ञानेश्वर मुळे घर सिमेंट रस्ता कामांचे लोकार्पण या कामांचा समावेश आहे. तर येथील सावता माळी मंदिरापुढील सभा मंडपासाठी 25/15 योजने अंतर्गत 7 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
यावेळी माजी सरपंच रामेश्वर तोडकरी, चंद्रोदन माळी,प्रदीप मगर, सामाजिक कार्यकर्ते रमेश काडगावकर,शंभुमहादेव दुध डेअरीचे हनुमंत गाभणे,शिवसेना सोशल मिडिया प्रमुख सुजित ठाकूर,शिवसेना शाखा प्रमुख संजय कोळी,भारत तानवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ राऊत, पांडुरंग माळी, ग्रामपंचायत सदस्य धर्मराज शिंदे,शाहू माळी,बालाजी फंड, कानिफनाथ माळी,सोसायटीचे व्हाईस चेअरमन विनायक करंडे, तानाजी गवळी, ओंकार कडगावकर ,चंदू गाभणे ,सुनील जोशी,रामेश्वर माळी,दिनेश माळी,अभिमान फंड,ज्ञानेश्वर माळी, समाधान माळी, मधुकर माळी, उत्तम राऊत,बालाजी माळी,अशोक माळी,अंगद माळी, भीमराव माळी, रामेश्वर गणपत माळी,योगेश अक्कलकोटे,भारत काडगावकर,शरणाप्पा काडगावकर,रमेश तानवडे, किशोर पलंगे,कुमार कांबळे, एकनाथ अक्कलकोटे, बालाजी शिंदे,चंद्रकांत गाभणे,गंगाधर आप्पा गाभणे, गोटी (आबा) धडके,शरद सोनवणे,दयानंद गवळी, गणपत गवळी,राजु सय्यद,भगवान लिंगफोडे,नागु (नाना) शिंदे, अतुल वाकळे, दशरथ वाकळे, सचिन काळदाते,नागनाथ स्वामी,सुरज मगर, अंकुश माळी, शिवाजी तानवडे, मिराज सय्यद,संदिपान करंडे, हनुमंत जांभळे,संजय बोदले,अंगद माळी,मधुकर माळी, सत्यवान माळी,संतोष स्वामी, महादेव गाभणे, शिरु तानवडे, अमर कानवले,वैजनाथ तानवडे ,महेश तानवडे,ज्ञानेश्वर तानवडे,अनिल गाभणे, बाळासाहेब तानवडे,शौकत शेख, बप्पा गवळी,नितीन करंडे,पोपट तानवडे,सिद्धेश्वर कानवले, अण्णासाहेब माने,सागर डोके आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments