काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील रहिवासी तथा मुंबई हायकोर्टाच्या संभाजी नगर (औरंगाबाद) खंडपीठातील प्रसिद्ध वकील ॲड. गणेश विलास पाटील (दहिवडीकर) यांची शुक्रवार दि.15 रोजी केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये त्यांची नोटरीपदी निवड झाली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारच्या वतीने देशातील विविध शहरातील यादी जाहीर करण्यात आली असून या यादीमध्ये नोटरी कायदा 1952 नुसार
ॲड. गणेश पाटील (दहिवडीकर) यांचा समावेश केला आहे.
ॲड. गणेश पाटील (दहिवडीकर) हे सध्या संभाजी नगर (औरंगाबाद) खंडपीठात वकीली करत असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून शुक्रवारी सायंकाळी तुळजापूर येथे किशोर गंगणे,मुन्ना धुमाळ,नारायण भोसले, सुरेश(आप्पा) पाटील(दहिवडीक),धन्यकुमार लोंढे,देवकर, रत्नदीप भोसले,आंनद जगताप,गणेश भिंगारे,सुरज पाटील, अर्जुन पाटील, सदानंद पाटील,शुभम पाटील आदींनी पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments