काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर पंचायत समितीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.यामध्ये तुळजापूर तालुक्यातील 14 केंद्रातून प्रत्येकी एक शिक्षक अशी निवड करण्यात आली होती.यामध्ये सुरतगाव केंद्रातून सावरगाव येथील रहिवाशी व सध्या जि.प.प्रा.शाळा गोंधळवाडी या ठिकाणी कार्यरत असलेले राऊत शंकर नामदेव यांना पंचायत समिती तुळजापूर यांच्यामार्फत दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचे अविरतपणे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान पंचायत समिती तुळजापूर यांच्यामार्फत प्रतिवर्षी केला जातो. शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या कामाचा गौरव करून त्यांच्या पाठीवर आणखीन उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रेरणेची थाप या कार्यालयाकडून दिली जाते.
यंदाही सुरत गाव केंद्रातील गोंधळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक श्री शंकर नामदेव राऊत यांना पंचायत समिती तुळजापूर येथील सभागृहामध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हातून भाजपचे तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे त्याचबरोबर गटशिक्षणाधिकारी इनामदार मॅडम व सर्व विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोंधळवाडी येथील सहशिक्षक शंकर राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सावरगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील व ग्रामस्थ, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यउपाध्यक्ष लालासाहेब मगर, तसेच जिल्हा शिक्षक सोसायटी व्हाईस चेअरमन अनिल हंगरकर, तुळजापूर शिक्षक सोसायटी माजी चेअरमन दयानंद जवळगावकर तसेच गोंधळवाडी शाळेचे मु.अ.श्री पिंपळे सर सहशिक्षक,श्री तोटावर सर, बोधगिरे सर,सहशिक्षिका वटणे मॅडम, भुसे मॅडम,चव्हाण मॅडम,गोंधळवाडी येथील सरपंच,गोपाळ भाऊ मोटे, उपसरपंच पोपट अण्णा मोटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री गुलचंद माने, उपाध्यक्ष संजय मोटे, शिक्षण प्रेमी संदिपान दुधाळ,यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments