Only न्युज तुळजापूर update.....
---पत्रकार उमाजी गायकवाड
निवडणूक आयोगाकडून शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून देशभरात सात टप्प्यात मतदान होणार असून 19 एप्रिलला मतदानाची सुरुवात होणार आहे.लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे.
देशातील लोकसभेच्या 543 जागेसाठी 7 टप्प्यात निवडणूक होणार असून या मध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल दुसरा टप्पा 26, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे, व सातवा टप्पा 1 जुन या 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत.
महाराष्ट्रातील 48 जागेसाठी लोकसभा निवडणूका या 5 टप्प्यात होणार असून यामध्ये 1मे, 13 मे, 20 मे, 25 मे, व 1 जुन असे 5 टप्पे राहणार आहेत. तर देशातील लोकसभेच्या सर्व जागेचा निकाल हा 4 जुन रोजी लागणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभेसाठी मतदान कधी व कुठे ते पहा
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा- 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा- 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा- 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा- 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments