Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता लागू झाल्याने सोशल मिडियावर आक्षेपार्ह व चुकीच्या पोस्ट करु नयेत; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर पोलीसांची करडी नजर राहणार ---सपोनि शैलेश पवार, तामलवाडी

     सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार 

काटी/उमाजी  गायकवाड
देशभरात लोकसभेच्या निवडणुका लागल्या असून त्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोस्ट वॉर रंगणार आहे. यातून वादाची ठिणगी पडून सामाजिक दुफळी निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी पोलिस सतर्क झाले असून सोशल  मीडियावर निवडणूक  आयोग व जिल्हा पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे.त्यामुळे निवडणूक काळात सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी लागणार  अन्यथा सायबर सेलच्या माध्यमातून कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी सोशल मिडियाद्वारे नागरीकांना सांगितले आहे.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी नागरिकांना आदर्श  आचारसंहिते पालन करण्याचे आवाहन  करुन आधुनिकीकरणाच्या जगात  प्रत्येक व्यक्ती मोबाइल, संगणकाच्या माध्यमातून सोशल मीडियाशी कनेक्टेड आहे. यामध्ये फेसबूक, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर, यू ट्यूब आदी सोशल मीडियाचा नागरिक सर्रासपणे वापर करतात. राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना, राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हेही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असतात. राजकीय घडामोडीवरून कार्यकर्त्यांमध्ये पोस्ट आणि कमेंट वॉर दिसून येते. सोशल मीडियावर एकमेकांची उणीदुणी काढताना अनेक वेळा पातळी घसरते. त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सध्या सोशल मिडियाचा वापर केवळ समाजहितासाठी व मनोरंजनासाठी करण्याचे आवाहन करीत सोशल  मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी लागणार असल्याचे सपोनि शैलेश पवार यांनी सांगितले. तसेच पोलीस पथक सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे सांगून आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास संबंधितावर कडक कार्यवाही करणार होणार असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये व आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही सोशल मिडियाद्वारे नागरिकांना सपोनि शैलेश पवार यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments