तुळजापूर:- येथील जय तुळजाभवानी माता प्राथमिक आश्रम शाळा येथे चि. दक्षराज विश्वजीत कदम (तेलंग) याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आई-वडिलांपासून दूर राहणाऱ्या शालेय मुलांना कदम (तेलंग) परिवाराच्यावतीने ५० चादरी व ५० बेडशीटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ. सामते साहेब, निवृत्त एसटी वाहतुक नियंत्रक दत्तात्रय कदम (तेलंग), सौ.विमल कदम(तेलंग),विशाल कदम (तेलंग), विश्वजीत कदम (तेलंग), सौ.मयुरी कदम (तेलंग), अमोल कदम (तेलंग) आणि मित्र परिवारांसह शिक्षक बांधव उपस्थित होते.
वाढदिवसाचा अवांतर खर्च टाळून एक सामाजिक बांधिलकीची जपणूक व्हावी याकरिता आश्रम शाळेतील लहानग्या मुलांना कौटुंबिक मायेचा आधार म्हणून चादर आणि बेडशीट देण्यात निर्णय घेतला अशी भावना दक्षराजचे आजोबा दत्तात्रय कदम तेलंग यांनी व्यक्त केली.
0 Comments