काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रुक्मिणी फाऊंडेशन च्यावतीने भीमा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव चव्हाण(टाकळी सिकंदर ता.मोहोळ) यांची नुकतीच सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मान्यवरांचे उपस्थितीत सपत्नीक सत्कार करण्यात आला.रुक्मिणी फाऊंडेशन चे सचिव प्रा.अभिमान हंगरगेकर यांचे हस्ते शाल,फेटा,बुके,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन शिवाजीराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवाजीराव चव्हाण,सौ.सुहासिनी चव्हाण,रुक्मिणी फाऊंडेशन चे सचिव प्रा.अभिमान हंगरगेकर,सौ.सुनंदा हंगरगेकर,श्रीमती स्वप्नाली चव्हाण,सौ.पूनम यशपाल हंगरगेकर,सौरभ चव्हाण,क.अदिती चव्हाण,शिवेंद्र हंगरगेकर, कु.कल्याणी चव्हाण,अयांश हंगरगेकर आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल शिवाजीराव चव्हाण यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments