येणेगुर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत बुधवार दि. 20 रोजी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक कोकळगावे अब्दुल कादर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंशासन दिनी विद्यार्थ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या कार्याचा अनुभव घेतला.
इयत्ता पहिली वर्गासाठी प्रतीक्षा शिवनेरी, अक्षरा फडताळे ,मारुती गायकवाड इयत्ता दुसरी सोमनाथ स्वामी, भागवत बिराजदार, फरहान शेख तिसरी वर्गासाठी गायकवाड अर्पिता, गायत्री सुरवसे, अक्षरा सुरवसे चौथी वर्गासाठी सायली पडताळे, विद्या गायकवाड, सुहाना खान, जरीना पठाण पाचवीसाठी नव्या कुंभार, अमिना मीयासय, सानिका देवकते, समीना मुल्ला सहावी वर्गासाठी शिवम घोडके, समर्थ चव्हाण, अक्सा चि काळे, फिजा शेख यांनी दिवसभर विद्यार्थ्यासमोर अध्यापन करण्याचे कार्य सक्षम रित्या पार पाडले. शाळेची मुख्याध्यापिका म्हणून दीक्षा किशोर मुळे यांनी उत्तम प्रशासन करून दिवसभर शाळा चालवण्याचा अनुभव घेतला.शेवटच्या तासिकेत या सर्व नवशिक्षकांनी आपापले अनुभव कथन करत असताना की शिक्षकी पेशा खूप अवघड आहे.लहान विद्यार्थ्यांना शिकवणे त्यांना सांभाळणे हे खूप कसरतीचे काम आहे.असे अनुभव व्यक्त केले.
यावेळी शिक्षक गोविंद जाधव, धनराज फुरडे, जमाल पाशा खैराटे, मुकिंदा गवळी, हरिश्चंद्र राठोड व बालाजी कवठे या गुरुजनांनी परिश्रम घेतले शेवटी मुख्याध्यापकांनी एक दिवसाच्या शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले.
0 Comments