Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन कोळी यांची महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक माध्यमिकच्या राज्य प्रमुखपदी निवड

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन कोळी यांची महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती माध्यमिकच्या राज्य प्रमुखपदी निवड करण्यात आली आले.

नुकत्याच संभाजी नगर मध्ये झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत एकमताने झालेल्या निर्णयात महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे यांनी निवडीचे पत्र मुख्याध्यापक  नितीन कोळी यांना दिले.

या पत्रात आपण आदर्श शिक्षक समितीचे सदस्य असून संघटनेविषयी असलेली आत्मीयता, कार्य करण्याची इच्छा, जिद्द, चिकाटी, संघटनेच्या ध्येय धोराचा अभ्यास, विद्यार्थी, शिक्षण व शिक्षक यांच्या विविध समस्या, शैक्षणिक बाबी संबंधी कार्य करण्याची आपल्या मध्ये असणारी कुवत पाहून आपली महाराष्ट्र शिक्षक समिती माध्यमिकच्या राज्य प्रमुखपदी निवड झाल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे. या निवडीच्या पत्रावर संस्थापक दिलीप ढाकणे, राज्य अध्यक्ष शिवाजीराव साखरे, राज्य महासचिव अंजूम पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मुख्याध्यापक नितीन कोळी यांची महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक माध्यमिकच्या राज्य प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.

यावेळी संस्थापक दिलीप ढाकणे,राज्य अध्यक्ष शिवाजीराव साखरे, रामदास सांगळे, महिला प्रमुख मुक्ता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments