Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

50 वर्षानंतर शालेय मित्रांच्या भेटीने सर्वच भारावले; तब्बल अर्धशतकानंतर काटी येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे दहावीचे माजी विद्यार्थी आले एकत्र; शालेय जीवनाच्या जुन्या आठवणीत रमले आजोबा

काटी/उमाजी गायकवाड
तब्बल अर्धशतकानंतर तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सन 1975 च्या इयत्ता दहावी बॅचचे माजी विद्यार्थी मंगळवार दि. 25 रोजी  सोलापूर येथील हॉटेल ऐश्वर्या मध्ये एकत्र आले. यासाठी सेवानिवृत्त महापालिका आयुक्त विलास विश्वनाथ ढगे यांनी पुढाकार घेतला होता. सोशल मीडियाने जग जोडले जात असताना, तब्बल अर्धशतकानंतर माजी विद्यार्थी एकत्र येण्याची किमया विलास ढगे यांच्या पुढाकारामुळे घडली. सर्वच अजोबा झालेले व उतारवयाकडे वाटचाल करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या मित्रांबरोबर एकच धमाल केली. या स्नेह मेळाव्यात 1975 मधील सेवानिवृत्त शिक्षक बी.एस.माने सरांची विशेष उपस्थितीती होती.

सन 1975 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सोलापूर येथील हॉटेल ऐश्वर्या मध्ये उत्साहात पार पडला. माजी शिक्षक बी.एस.माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात जणू वर्गच भरविण्यात आला होता. तब्बल 50 वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र आलेल्या शालेय जीवनातील जुन्या मित्रांना ओळखणेही अवघड झाले होते. या जुन्या सवंगडींनी एकत्र येत शालेय जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. आपले लाडके शिक्षक माने सरांशी देखील विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारुन जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच याप्रसंगी सर्वांनी एकत्रितपणे स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

  हॉटेल ऐश्वर्या मध्ये स्नेह भोजनाचा आस्वाद घेताना..

हॉटेल ऐश्वर्या मध्ये संपन्न झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी सेवानिवृत्त वर्ग शिक्षक बी.एस.माने यांच्यासह महापालिकेचे सेवा निवृत्त आयुक्त विलास ढगे, विस्तार अधिकारी दादाराव सावंत, सेवा निवृत्त शिक्षक दिलीप नारायणकर, रामचंद्र पवार,धनाजी देशमुख,बंडू काळे,
अरुण सुरडकर, प्रकाश पाटील (दहिवडीकर), तानाजी लोहार, सुनंदा भोसले (शहापूरकर), शामल धुमाळ (साळुंखे),कांताबाई अरुण शितोळे (हंगरकर) उपस्थित होते. उपस्थित मित्रांनी आपल्या भावना व्यक्त करुन जुन्या चांगल्या-वाईट आठवणीचा इतिहास मांडताना सर्वच भारावले होते. या स्नेह मेळाव्यासाठी विविध  ठिकाणांहून आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र आले होते.
    हॉटेल ऐश्वर्या मध्ये एकत्रित नाष्टा करताना...

   हॉटेल मधील क्षण.....

हॉटेलमधील प्रसंग.....

Post a Comment

0 Comments