Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथे सिध्दीविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन

तुळजापूर/उमाजी  गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील दहिवडीचे सुपुत्र हिंमत बाबासाहेब गाटे डॉ. अमीर मुलानी संचलित सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आय.सी.यु.सेंटरचे तुळजापूर येथील नवीन बसस्थानक जवळील कृष्णा लॉज शेजारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूम-परंडा-वाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते रविवार दि.23 रोजी दुपारी 12:30 उद्धघाटन करण्यात आले.

तुळजापूर शहरातील तसेच तालुक्यातील रुग्णांसाठी या हॉस्पिटलचे खास वैशिष्ट्य  म्हणजे हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली असून ज्यामध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग,24 तास आपात्कालीन विभाग,  सुसज्ज ऑपरेशन थिएटर,  सुसज्ज अद्ययावत आयसीयू फुप्फुसांचे आजार, पोटाचे विकार, सर्पदंश, डायबिटीस, अस्थिरोग विभाग, ट्रामा केअर सेंटर,  ऑपरेशन थिएटर,  स्पेशल रूम अत्याधुनिक व्हेंटीलेटर,एक्स-रे सुविधा, ईसीजी, मल्टी पॅरामीटर्स, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, पॅथॉलॉजी लॅब,24 तास मेडिकल  थॉयराईड, दमा आणि टीबी,पॅरालेसिस, हृदयविकार,ॲलर्जी टेस्टिंग अशा विशेष सुविधाही सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच छताखाली मिळणार असल्याची माहिती डॉ.हिंमत  गाटे व डॉ.अमीर मुलानी यांनी उपस्थित  मान्यवरांना  दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा हॉस्पिटलच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सिध्दीविनायक हॉस्पिटल पर्वणी ठरेल
---माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
अद्ययावत सेवा सुविधा आणि परिपूर्ण असणारे सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांसाठी निश्चितच तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने पर्वणी ठरेल असे राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मत व्यक्त  करुन सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या.

गुणवत्तापूर्ण सेवा- सुविधा देत रुग्णांसाठी  24 तास सेवा द्यावी
  --मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी 
तुळजापूर शहरात नव्याने सुरु  झालेल्या सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना गुणवत्ता पूर्ण सेवा-सुविधा देत 24 तास सेवा द्यावी अशी अपेक्षा मा.नगराध्यक्ष सचिन यांनी व्यक्त केली व सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भुम-परंडा-वाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, तुळजापूरचे आमदार  राणाजगजितसिंह पाटील, मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मा.नगराध्यक्ष विनोद (पिटू भैय्या) गंगणे, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, कृषी  उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, मा. नगरसेवक विशाल रोचकरी, सुनिल रोचकरी, जिल्हा  फेडरेशनचे अध्यक्ष नारायण नन्नवरे,भाजपचे  तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी  जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील,आरोग्य कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद रोकडे, डॉ.कार्तिक यादव, ॲड.गणेश पाटील (दहिवडीकर),विलास पाटील,सुरेश(अप्पा)पाटील दहिवडीकर, संतोष अमृतराव, बाबासाहेब  गाटे, रविंद्र अंबुरे,संजय फंड (जळकोटवाडी) विजय  निंबाळकर, पोलीस  पाटील रमेश गाटे, कल्याण गाटे,दहिवडी ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

 डॉ.हिंमत गाटे यांना शुभेच्छा देताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह मान्यवर...

सुसज्ज ऑपरेशन थिएटरची पाहणी करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील व मान्यवर...

Post a Comment

0 Comments