Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

गवळेवाडी बस स्थानकावर प्रवासी निवारा शेडचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घघाटन

प्रवाशी निवारा शेडचे उद्घघाटन करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा)बोबडे, मा. जि.प. सदस्य राजकुमार पाटील आदी.....

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी  येथील बस स्थानकावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या  माध्यमातून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एसटी प्रवासी निवारा शेड उद्घघाटन सोमवार  दि. 5 रोजी भाजपचे आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

गवळेवाडी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एसटी बस स्टॉप असून गवळेवाडीतील ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांना याच बस स्टॉपवरुन तुळजापूर, वडाळा, सावरगावला ये-जा करावे लागते. येथील विद्यार्थी वडाळा येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निवारा शेड नव्हता. गेली कित्येक वर्षे गवळेवाडी बस स्थानकावर प्रवासी निवारा शेड बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत होती.मात्र याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात होते.प्रवासी शेड अभावी प्रवाशांसह शाळकरी मुले तासनतास एसटीच्या प्रतिक्षेत वाट पहात उभी असत. अखेर स्थानिक ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपचे कार्यकर्ते दत्ता रामचंद्र मोरे यांनी ही गोष्ट भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्या कानावर घातली. तात्काळ राजकुमार पाटील यांनी दत्ता मोरे यांच्यासह ग्रामस्थांना घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेऊन निवारा शेड उभे करण्यासाठी विनंती केली. आ. पाटील यांनी तात्काळ ग्रामस्थ व शाळकरी मुलांची गैरसोय लक्षात घेऊन गवळेवाडी येथील बस स्थानकावर 7 लाख रुपयांचे प्रवासी निवारा शेड मंजूर केले. 

भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, गवळेवाडीचे  माजी सरपंच  राजाभाऊ फंड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार दि.5 ऑगस्ट रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या प्रवासी निवारा शेडचे उद्घघाटन करण्यात आले. बऱ्याच  वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी प्रवासी निवारा शेड उभारण्यात येणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जि.प.सदस्य राजकुमार पाटील,गवळेवाडीचे माजी सरपंच राजाभाऊ फंड, भा.ज.पा.युवा अध्यक्ष रोहित पाटील,मनोज फंड,नानासाहेब माने,अशोक वळसे, अनंत माने, जीवन देशमुख,कुबीर यादव, भैरवनाथ माने,तानाजी यादव, संजय माने,महावीर वळसे,बबन माने,योगेश माने,शंकर यादव, महादेव मोरे,विकास हजारे, कुमार माने,सुभाष काळे,पप्पू वळसे, भटके समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन काळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments