Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सर्जेराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

काटी:-तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले 
  
शिवरत्न न्यूज चे संपादक तथा तामलवाडी ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व शिवरत्न बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दि ७ आगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे ही वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने सर्जेराव गायकवाड यांचा फेटा व शाल.श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी हणमंत गवळी व पांडुरंग म्हेत्रे यांनी आपले विचार व्यक्त करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी दस्तगीर शेख, चौड्डाप्पा मसुते, पांडुरंग म्हेत्रे, पांडागळे , अप्पुराजे भोसले, प्रशांत राऊत, बबन राऊत, सचिन शिंदे, हणमंत गवळी, मोहसीन शेख, अमोल माळी,प्रदीप माळी, दत्तात्रय जगताप तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments