Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ व सरस्वती विद्यालयाच्या वतीने उद्योजक डी.राम रेड्डी यांना "जीवन गौरव" पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

काटी/उमाजी  गायकवाड 
अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने बालाजी अमाईन्सचे संचालक डी.राम रेड्डी  यांना नुकतेच "जीवन गौरव"पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्याबद्दल तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ व सरस्वती विद्यालय यांच्या वतीने बालाजी  सरोवर, सोलापूर येथे सोमवार दि. 5 रोजी दुपारी डी. राम रेड्डी यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी यावेळी संस्थेचे अध्यक्ष बसवन्नप्पा मसुते, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,सचिव यशवंत लोंढे, मल्लिकार्जुन मसुते, बाळासाहेब जगताप, अब्बास पटेल, सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे, विकास खंडाळकर, शिवदास पाटील, चंद्रकांत साळुंके, महादेव मसुते, शिवकुमार सीताफळे, लक्ष्मण पाटील, योगेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments