Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सावरगाव येथील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नागोबा यात्रेत खरगा विधी व गणाची मिरवणूक भक्तीमय वातावरणात संपन्न

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील सावरगांव येथील तीन दिवसापासुन सुरु असलेल्या नागोबा यात्रेत बुधवारी सेवाधारी मानकऱ्याच्या उपस्थितीत खरगा विधी संपन्न झाला. सोमवार दि. 5 रोजी आषाढ अमावश्येपासुन  सावरगावच्या नागोबा यात्रेस प्रारंभ झाला. या यात्रेतील अनोखे व एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे  साप, पाल व विंचू एकत्रित आल्याचे दुर्मिळ दृश्यांचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने  गर्दी केली होती.

बुधवार दि.7 रोजी सकाळी हजारो भाविकांच्या  उपस्थितीत पहाटे 5 वाजनेच्या सुमारास मंदिराशेजारी असलेल्या जलकुंडाजवळ मानकरी संजय कोळी यांनी आणलेल्या जलाने सद्गुरू स्वामी यांना स्नान घातले.त्यानंतर मंदीरात समोरील दगडी शिळेवर मानकरी आण्णासाहेब भालेकर यांनी मंदीराचे नवीन पुजारी सद्गुरू स्वामी यांचे दाढी,केस कापुन खरगा विधी संपन्न  झाला. यावेळी भजनी मंडळाने भक्तिरसात तल्लीन होऊन भजन गायन केले.

विधीनंतर संचार होवुन तीर्थकुंडापासून मंदिर भोवताली  प्रदक्षिणा मारून नागनाथ महाराज की जय असा जयघोषाने मंदिर परीसर दुमदुमुन गेला होता. सेवाधारी मंडळी लिंबाऱ्याच्या पाल्याच्या माळा गळ्यात घालुन सहभागी झाले होते शेवटी भाकवणूक व महा आरतीने गणाच्या मिरवणुकीची व खरगा विधीची भक्तीमय वातावरणात सांगता झाली.

यात्रेतील महत्त्वाची समजली जाणारी लिंबाऱ्याची माळ घालून सावरगावातील सकल मराठा बांधवांकडून तुळजापूरात मनोज जरांगे यांचा सत्कार

तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयाच्या आवारात मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेनंतर सावरगाव नागनाथ मंदीर देवस्थानचे मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांच्या हस्ते देण्यात आलेली पवित्र व महत्वाची समजली जाणारी लिंबाऱ्याची माळ सावरगाव येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने घालून मराठा योध्दा मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी अणि त्यांच्या मराठा आरक्षण लढ्यासाठी यश यावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुक्राचार्य करंडे, अविनाश शिंदे,गणेश फंड,दत्ता ताटे,ज्योतीराम ताटे , संजय मुळे , सुनिल शिंदे,गोकुळ शिंदे , हणुमंत ताटे,संदिप करंडे,अमोल शिंदे,गणपत दरेकर,द्रोपतराज शिंदे,हणुमंत फंड,अतुल पवार, सहदेव फंड,रोहन दरेकर आदीजण उपस्थित होते.

खरगा विधी सोहळ्या दरम्यान उपस्थित मान्यवर...
खरगा विधी सोहळ्या दरम्यान भाजपचे तालुकाध्यक्ष  संतोष बोबडे, माजी  जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी सरपंच रामेश्वर तोडकरी,माजी उपसरपंच  आनंद बोबडे, एकनाथ अक्कलकोटे, योगेश काढगावकर, परमेश्वर तानवडे, राहुल अक्कलकोटे, दत्तात्रय लिंगफोडे, आदेश मेंगळे,  प्रविण तोडकरी, भगवान लिंगफोडे, तात्या तोडकरी, अथर्व तोडकरी, राहुल तोडकरी,ओंकार अक्कलकोटे, गणेश गाबणे, नवनाथ तानवडे, महादेव तानवडे, एकनाथ लिंगफोडे, रमेश  काढगावकर,प्रतिक डोके, दत्ता डोके, योगेश तानवडे, सुरज ढेकणे, विशाल ढेकणे, शिवम स्वामी, सचिन गाबणे, रुद्रा फंड, बजिरंग तानवडे, नवनाथ माने, शुभम अक्कलकोटे, चंद्रकांत गाबणे, हनुमंत गाबणे, हरी बोबडे, अण्णासाहेब तानवडे, ओंकार काढगावकर, काशिनाथ तोडकरी, मानकरी बाळासाहेब तानवडे, रामलिंग गाबणे, विजय तानवडे, नागराज भडंगे, भारत कानवले, गुरलिंग तानवडे, दिनेश कुंभार, आबा डोके, नंदकुमार  पाटील,संजय कोळी, आबा भालेकर, रामा भडंगे, विशाल तोडकरी, तात्या तोडकरी, चंद्रकांत गाढवे, विजय तोडकरी, विष्णू डोके, श्रीशैल्य तानवडे, राजेंद्र (बापू) तोडकरी, राहुल कानवले, साकी मानकरी महारुद्र अक्कलकोटे, गणपत तानवडे, दत्ता काढगावकर,राम तानवडे, दादाराव अक्कलकोटे, वैभव  तोडकरी, रमेश तानवडे, पिन्टू तानवडे,तम्मा अक्कलकोटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी  झाले होते.

Post a Comment

0 Comments